‘वैज्ञानिक मानसिकता’ विकसित करणे, हे प्रत्येक भारतीयाचे मूलभूत कर्तव्य आहे! राज्यघटनेत असे कलम समाविष्ट करणारे भारत हे जगातील पहिले राष्ट्र आहे.

केवळ भारतीयच नव्हे तर आशियाई देशातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी़ व्ही. रामण् यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी पारदर्शक माध्यमातून जाताना प्रकाशाची विखुरण्याची जी क्रिया घडून येते त्यावरील संशोधन सादर केले होते. हा शोध विज्ञानात ‘रामण् परिणाम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसाचे औचित्य साधून जनसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता विकसित व्हावी; या उद्देशाने ‘विज्ञान दिन’ साजरा केला जातो.......